स्तोत्रसंहिता
स्तोत्रसंहिता 1
1 माणसाने जर वाईट लोकांचा सल्लामानला नाही, तो पापी लोकांसारखा राहिला नाही
आणि देवावर\f + \fr 1:1 \fk माणूस … देव किंवा“जो दुष्टांचा सल्ला मानत नाही किंवा पापाच्या मार्गाने जात नाही वा टिंगल करणाऱ्याच्या घरात राहात नाही त्याला आशीर्वाद मिळतात.”\f* विश्वास न ठे वणाऱ्या लोकांबरोबर राहाणे त्याला आवडले नाही
तर तो माणूस खरोखरच सुखी होईल.
2 चांगल्या माणसाला परमेश्वराची शिकवण आवडते
तो त्या बद्दल रात्रंदिवस विचार करत असतो.
3 त्यामुळे तो माणूस ओढ्याच्या कडेला लावलेल्या झाडासारखा शक्तिशाली होऊ शकतो
तो योग्यवेळी फळे येणाऱ्या झाडासारखा असतो तो पाने असलेल्या व न मरणाऱ्या झाडासारखा असतो
तो जे काही करतो ते यशस्वी होते.
4 परंतु वाईट लोक असे नसतात ते वाऱ्यावर उडून
जाणाऱ्या फोलपटासारखे असतात.
5 न्यायालयातील खटल्याचा निवाडा करण्यासाठी जर चांगले लोक एकत्र आले
तर वाईट लोकांना अपराधी ठरविले जाईल ते पापीलोक निरपराध ठरविले जाणार नाहीत.
6 का? कारण परमेश्वर चांगल्यांचे रक्षण करतो
आणि वाईटाचे निर्दालन करतो.