स्तोत्रसंहिता 3
दावीद आपला मुलगा अबशालोम याच्याकडून पळाला तेव्हाचे दावीदाचे स्तोत्र.
1 परमेश्वरा मला खूप शत्रू आहेत.
खूप लोक माझ्या विरुद्ध गेले आहेत.
2 बरेच लोक माझ्याबद्दल बोलत आहेत ते लोक म्हणतात, “देव त्याला वाचवणार नाही.”
3 परंतु परमेश्वर, तूच माझी ढाल आहेस
तूच माझे वैभव आहेस
परमेश्वर मला महत्व\f + \fr 3:3 \fk तूच … महत्व शब्दशः“तू माझे वैभव आहेस तू माझे मस्तक उचलणारा आहेस.”\f* देणारा तूच आहेस.
4 मी परमेश्वराची प्रार्थना करेन
आणि तो मला त्याच्या पवित्र डोंगरावरून उत्तर देईल!
5 मी पडून विश्रांती घेतो तरी मी जागा होईन हे मला माहीत आहे.
मला हे कसे कळते?
कारण परमेश्वर मला सांभाळतो माझे रक्षण करतो.
6 माझ्याभोवती हजारो सैनिक असतील.
परंतु मी या शत्रूंना घाबरणार नाही.
7 परमेश्वरा जागा हो!
देवा मला वाचव तू फार शक्तिशाली आहेस
तू जरमाझ्या शत्रूंच्या थोबाडीत मारलीस
तर त्यांचे सगळे दात पडतील.
8 परमेश्वरा, जय तुझाच आहे.
परमेश्वरा तू कृपा करून तुझ्या लोकांवर दया कर.