स्तोत्रसंहिता 8
प्रमुख गायकासाठी \tl गित्तीथ\tl* सुरावर\f + \fr 8:1 \fk गित्तीथच्या सुरावर हेकदाचित एखादे वाद्य असू शकेल. किंवा देवळातील वाद्यवृंदात वाद्य वाजवणारा वादक. पाहा 1 इतिहास 15:21, 16:4-7.\f* बसवलेले दावीदाचे स्तोत्र.
1 परमेश्वरा, माझ्या स्वामी तुझे नाव पृथ्वीवरील नावात सर्वात चांगले आहे, थोर आहे.
तुझ्या नावाने तुला स्वर्गात गौरव प्राप्तकरुन दिला आहे.
2 मुला बाळांच्या मुखातून तुझे गुणगान ऐकू
येते तुझ्या शंत्रूना गप्प बसवण्यासाठी तू हे सारे करतोस.
3 परमेश्वरा, तू तुझ्या हातांनी निर्माण केलेल्या आकाशाकडे मी बघतो तू केलेल्या चंद्र आणि ताऱ्यांकडे मी बघतो.
आणि मला आश्चर्य वाटते.
4 लोक तुला इतके महत्वाचे का वाटतात?
तू त्यांची आठवण तरी का ठेवतोस?
लोक\f + \fr 8:4 \fk लोक … लोक शब्दश:“माणूस माणसाचा मुलगा” किंवा एनॉश. आदमाचा मुलगा, माणसे आदामाची आणि एनॉशची वंशज आहेत असे सांगण्याची ही हिब्रू पध्दत आहे. नवीन शास्त्रात याचा उपयोग एक माणसाचा, येशूचा किताब म्हणून केला आहे.\f* तुझ्यासाठी इतके महत्वाचे का आहेत?
तू त्यांची दखल तरी का घेतोस?
5 परंतु लोक तुला महत्वाचे वाटतात.
तू त्यांना जवळ जवळ देवच बनवलेस आणि तू लोकांना गौरवाचे आणि मानाचे मुकुट चढवितोस.
6 तू लोकांना तू निर्माण केलेल्या
सर्व गोष्टींचे अधिपत्य दिलेस.
7 लोक मेंढ्या, गाय, बैल आणि रानातले वन्य पशू यांच्यावर राज्य करतात.
8 ते आकाशातल्या पक्ष्यांवर
आणि सागरात पोहणाऱ्या माशावर राज्य करतात.
9 परमेश्वरा, आमच्या स्वामी तुझे नाव पृथ्वीवरील सर्व नावात अतिशय चांगले आहे, अद्भुत आहे.