11 “मग, यरुशलेम, तुझ्या लोकांनी माझ्याविरुध्द केलेल्या दुष्कृत्यांची तुला लाज वाठणार नाही. का? कारण त्या वाईट लोकांना मी यरुशलेममधून बाहेर घालवीन. त्या गर्विष्ठांना मी दूर नेईन. माझ्या पवित्र पर्वतावर त्या माणसांतील कोणीही गर्विष्ठ असणार नाही.
12 माझ्या नगरीत (यरुशलेममध्ये) मी फक्त नम्र व लीन लोकांनाच राहू देईन. ते परमेश्वराच्या नावावर श्रध्दा ठेवतील.
13 इस्राएलमधील जिवंत राहिलेले लोक वाईट कृत्ये करणार नाहीत. ते खोटे बोलणार नाहीत. खोट्याच्या आधारे ते इतरांना फसविणार नाहीत. चरुन आडव्या होणाऱ्या मेंढ्यांप्रमाणे ते शांत राहतील त्यांना कोणीही त्रास देणार नाही.”
14 यरुशलेम, गा आणि सुखी हो!
इस्राएल, आनंदाने जल्लोष कर!
यरुशलेम, आनंदात राहा! मजा कर!
15 का? कारण परमेश्वराने तुला शिक्षा करण्याचे थांबविले आहे.
त्यांने तुझ्या शत्रूंचे भक्कम मोर्चे नष्ट केले आहेत.
इस्राएलचा राजा, परमेश्वर तुझ्याबरोबर आहे.
आता तुला कोणत्याही अरिष्टाची काळजी करण्याचे कारण नाही.
16 त्या वेळेला, यरुशलेमला, असे सांगितले जाईल.
समर्थ हो! घाबरु नको!
17 परमेश्वर तुझा देव, तुमच्याबरोबर आहे.
तो बलवान वीराप्रमाणे आहे.
तो तुला वाचवील.
तो तुझ्यावर किती प्रेम करतो,
हे तो तुला दाखवून देईल.
तुझ्याबरोबर तो किती सुखी आहे, हेही तुला दिसेल.
18 मेजवानीच्या वेळेला लोक असे हासतात,
आनंदात असतात, तसाच तो तुझ्याबरोबर हासेल आनंदात असेल.
परमेश्वर म्हणाला, “मी तुझी अप्रतिष्ठा दूर करीन.
त्या लोकांना मी तुला दुखवू देणार नाही.\f + \fr 3:18 \fk मी तुझी … देणार नाही हिब्रूमधीलया ओवीचा अर्थ समजत नाही.\f*
19 त्या वेळी, तुला हजा करणाऱ्यांना मी शिक्षा करीन.
माझ्या इजा झालेल्या माणसांना मी वाचवीन.
बळजबरीने दूर पळून जायला लागलेल्या माझ्या माणसांना मी परत आणीन.
मी त्यांना कीर्ती मिळवून देईन.
सर्व लोक त्यांची प्रशंसा करतील.
20 त्या वेळी, मी तुला परत आणीन.
मी तुम्हा सर्वांना परत एकत्र आणीन.
मी तुला प्रसिध्दी मिळवून देईन, सगळीकडचे लोक तुझी स्तुती करतील
प्रत्यक्ष तुझ्या डोळ्यांदेखत मी कैद्यांना परत आणीन, तेव्हाच हे सर्व घडून येईल.”
परमेश्वरच असे म्हणाला आहे.