23
देवापुढे आपला वाद करण्याची ईयोबाची इच्छा 
 1 नंतर ईयोबने उत्तर दिले व तो म्हणाला, 
 2 “तरीही मी आज कडवटपणे तक्रार करीन? 
कारण माझा त्रास माझ्या विलापाहून भारी आहे. 
 3 देवाला कुठे शोधावे ते मला माहीत असते तर 
मी त्याच्या ठिकाणापर्यंत जाऊन पोहचलो असतो 
 4 मी देवाला माझी फिर्याद सांगितली असती. 
माझ्या मुखाने सतत वाद घातला असता. 
 5 त्याने माझ्या युक्तिवादाला कसे प्रत्युतर दिले असते ते मला कळले असते. 
तो मला काय म्हणाला ते मी लक्षात घेतले असते. 
 6 त्याच्या महान सामर्थ्याने त्याने माझ्याविरुध्द वाद केला असता का? 
नाही; तर त्याने माझ्याकडे लक्ष दिले असते. 
 7 तेथे सरळ मनुष्यांनी त्याच्याशी वाद केला असता. 
म्हणजे मी माझ्या न्यायाधीशापासुन सुटलो असतो. 
 8 पाहा, मी पूर्वेकडे गेलो, पण तो तीथे नव्हता, 
मी पश्चिमेकडे गेलो, पण मी त्यास पाहीले नाही. 
 9 उत्तरेकडे तो कार्य करीत असला, तरी मला तो दिसू शकत नाही. 
आणि दक्षिणेकडेही, जेथे तो स्वतःस लपवितो त्यामुळे तेथेही तो मला दिसत नाही. 
 10 परंतु माझा मार्ग त्यास कळाला आहे, 
जेव्हा तो माझी परीक्षा घेतो, तेव्हा मी सोन्यासारखा असेन. 
 11 त्याच्या पावलावर माझी पावले पडत आहेत, 
मी त्याचा मार्ग धरला आहे व त्यापासून वळालो नाही. 
 12 मी त्याच्या ओठांच्या आज्ञेचे पालन करण्यापासुन मागे वळालो नाही, 
मी संपत्ती प्रमाणे माझ्या हृदयात देवाच्या मुखातून बाहेर पडणारे शब्द ठेवले आहेत. 
 13 परंतु देव कधी बदलत नाही, त्यास कोण बदलेल. 
त्याच्या मनाच्या ईच्छेप्रमाणे तो करतो. 
 14 कारण तो माझ्यासाठी त्याचा हूकुम चालवितो, 
माझ्यासाठी त्याच्या बऱ्याच योजना आहेत. 
 15 यास्तव, मी त्याच्या उपस्थीतीला घाबरतो, 
जेव्हा मी त्याच्याबद्दल विचार करतो, मला त्याची भीती वाटते. 
 16 त्यामुळे देवाने माझे हृदय कमजोर केले आहे, 
आणि सर्वशक्तिमानाने मला भयभीत केले आहे. 
 17 काय मी अंधकाराने काढून टाकला गेलो नाही काय? 
आणि गडद अंधकाराने माझे मुख झाकले गेले नाही काय.”