१२
 १ तेव्हां एफ्राइमी माणसें एकत्र मिळलीं आणि उत्तरेस जाऊन इफताहाला म्हणालीं, “तुंझ्यासंगतीं यायाला आम्हास बोलावल्यावांचून तूं आम्मोनी लोकांसीं लढायाला कां पलिकडे गेलास? आम्ही तुझ्यासुध्दा तुझ्या घराला आग लावून जाळूं”  २ तेव्हां इफताह त्यांस बोलला, “आम्मोनी लोकांसीं माझें व माझ्या लोकांचें फार भांडण होत होतें; तेव्हां म्या तुझ्यास बोलाविलें, परंतु तुझी मला त्यांच्या हातांतून सोडविलें नाहीं.  ३ तेव्हां तुझ्याकडून तारण होत नाहीं, हें पाहून मी आपला जीव आपल्या मुठींत घालून आम्मोनी लोकांजवळ पलिकडे गेलों, आणि परमेश्वराने ते माझ्या हातीं दिल्हे; तर आजच्या दिवसीं तुम्ही लढायाला मजवर कां चढून आलां?”  ४ तेव्हां इफताहाने गिलादी सर्व माणसें मिळवून एफ्राइमासीं लढाई केली, आणि गिलादी माणसानी एफ्राइमासीं मारिले, कां तर ते बोलले होते, “एफ्रइमामध्यें व मनाश्श्यामध्यें तुम्ही गिलादी एफ्राइमींतून पळणारे आहा,”  ५ तेव्हां गिलाद्दानी एफ्राइम्यांसमोर यार्देनेचे उतारे रोखून धरिले, आणि असें झालें कीं जेव्हा कोणी एफ्राइमी पळतांना बोलला, “तुम्ही मला पार जाऊं द्दा,” तेव्हां गिलादी माणसें त्यास बोलत असत, “तूं एफ्राथी आहेस कीं काय?” आणि तो “नाहीं” जर बोलला,  ६ तर तीं त्याला बोलत, “आतां तूं शिब्बोलेथ असें म्हण;” मग तो “सिब्बोलेथ” असें बोले, कां कीं त्याला नीट बोलतां आलें नाहीं; मग तीं त्याला धरून यार्देनेच्या उता-यांजवळ जिवें मारीत असत; तर त्या वेळेस एफ्रइमांतलीं बेताळीस हजार माणसें पडलीं.  ७ इफताहाने तर साहा वर्षे इस्त्राएलाचा न्याय केला; मग तो इफताह गिलादी मेला, आणि गिलादांतल्या एका नगरांत पुरला गेला.  ८ मग त्याच्यामागें बेथलेहेमांतल्या इब्जानाने इस्त्राएलाचा न्याय केला.  ९ तेव्हा त्याला तीस पुत्र व तीस कन्या होत्या; त्या त्याने बाहेर लावून आपल्या पुत्रांसाठीं बाहेरून तीस कन्या आणिल्या; त्याने तर सात वर्षे इस्त्राएलाचा न्याय केला.  १० नंतर इब्जान मेला, आणि बेथलेहेमांत पुरला गेला.  ११ आणि त्याच्यामागें जबूलुनी एलोन इस्त्राएलाचा न्यायधीश झाला; त्याने तर दाहा वर्षे इस्त्राएलाचा न्याय केला.  १२ नंतर तो जबूलुनी एलोन मेला, आणि जबूलुन देशांतल्या आम्यालोनांन पुरला गेला.  १३ आणि त्यानंतर हिल्लेलाचा पुत्र आब्दोन जो पिराथोनी, तो इस्त्राएलाचा न्यायाधीस झाला.  १४ आणि त्याला चाळीस पुत्र व तीस नातू होते; ते सत्तर गाढवांवर बसत असत; त्याने तर आठ वर्षे इस्त्राएलाचा न्याय केला.  १५ मग तो पिराथोनी हिल्लेलाचा पुत्र आब्दोन मेला, आणि अमानेक्यांच्या डोंगरांवर एफ्राइम प्रांतांतल्या पिराथोनांत पुरला गेला.