३
 १ पर्म्वेश्वराचे वचन योना जवाळ दुसर्याने आले,  २ तू उठून नीनवेची जी मोठी नगरी आहे तिजकड़े जा,अणि जो उपदेश में तुला सुचविन तो तिला गाजवून सांग.  ३ मग परमेश्वराच्या वाचनाने योना उठून नीनवेस गेला.नीनवे तर फार मोठी नगरी होती. तीही दिवसांच्या वाटचालीची होती.  ४ आणि योना नगरात एक दिवसाच्या वाटचालीपर्यंत जाऊ लागला,आणि त्याने गाजवून सांगितले, की आजुन चाळीस दिवस आहेत,मग निनवे धुळीस मिळेल. 
 ५ तर नीनवेतल्या मनुष्यांनी देवाला विश्वसिले, आणि उपासाची सूचना गाजविली, आणि मोठ्यापासून लहानपर्यंत गोनताट नेशिले.  ६ कारण कि नीनवेच्या राज्याकडे वर्तमान पोहोंचले होते,तेव्हा त्याने सिहांसानावरून उठून आपला झगा आपल्या अंगातून काढून ठेविला.मग तो गोणताट नेसून राखेवर बसला.  ७ आणि राजाने आणि त्याच्या प्रधानाच्या ठरावाने नीनवेत गाजवून सांगितले, कि मनुष्यांनी अथवा पशूंनी,गुरांनी ,अथवा मेंढरांनी काही चाखू नये.  ८ परंतु मनुष्य आणि पशु गोणताट नेसोत; आणि देवाकडे मनापासून हाक मारोत आणि प्रत्येक कुमार्गापासून आणि जो बलात्कार त्यांच्या मुठी असेल त्या पासून फिरोत.  ९ आम्ही नाश पावू नये म्हणून देव वळेल,अनुतापेल,आणि आपल्या संतप्त क्रोधापासून फिरेल कि नाही?हे कोण जाणे?  १० तर ते आपल्या कुमार्गापासून फिरेले,अशी त्यांची कर्मे देवाने पहिली आणि ज्या संकटाविषयी देव बोलला होता ,कि मी त्यास नाश करीन,त्याविषयी तो अनुतापला आहे,आणि त्याने ने केले नाही.