पौलाचे थेस्सलनीकाकरांस दुसरे पत्र
लेखक
1 थेस्सलनीकाकरांप्रमाणेच हे पत्र पौल, सीला आणि तीमथ्य यांच्याकडून आहे. या पत्राचा लेखक 1 थेस्सलनीकाकरांस आणि पौलाच्या इतर पत्रांसारख्या शैलीचा वापर करतो. यावरुन दिसून येते की मुख्य लेखक पौल होता. सीला आणि तीमथ्य हे अभिवादनांमध्ये समाविष्ट आहेत (2 थेस्सल. 1:1) अनेक अध्यायांमध्ये आपण असे लिहितो की, त्या सर्व तीन जणांनी सहमती दर्शविली. लिखित स्वरूपाचे लिखाण पौलाचे नव्हते कारण त्याने फक्त शेवटच्या शुभेच्छा (अभिवादन) आणि प्रार्थना लिहिल्या (2 थेस्सल 3:17). पौलाने कदाचित तीमथ्य किंवा सीलाला पत्र लिहिले असावे.
तारीख आणि लिखित स्थान
साधारण इ.स. 51 - 52.
पौलाने 2 थेस्सलनीकाकरांस हे करिंथमध्ये लिहिले, जेथे त्याने 1 थेस्सलनीकाकरांस लिहिले.
प्राप्तकर्ता
2 थेस्सलनीकाकरांस 1:1 “थेस्सलनीकाकरांची मंडळी” म्हणून 2 थेस्सलनीकाकरांसच्या उद्देशाने वाचकांना सूचित करते.
हेतू
परमेश्वराच्या दिवसाबद्दल सैद्धांतिक त्रुटी सुधारण्याचा उद्देश होता. विश्वासणाऱ्यांची प्रशंसा करणे आणि त्यांचा विश्वास दृढ असल्याचे त्यांना उत्तेजन देणे आणि जे लोक त्यांच्या आत्म-भ्रामक स्वार्थामुळे विश्वास ठेवत होते, त्यांनी असा विचार केला होता की परमेश्वराचा दिवस येण्याआधीच परमेश्वराच्या परत आला होता आणि या शिकवणीचा त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी दुखावला होता.
विषय
आशेमध्ये राहणे
रूपरेषा
1. नमस्कार — 1:1, 2
2. अडचणीत सांत्वन — 1:3-12
3. परमेश्वराच्या दिवसाविषयी सुधारणा — 2:1-12
4. त्यांच्या भाग्यासंदर्भात स्मरण — 2:13-17
5. व्यावहारिक बाबींसंबंधी उद्बोधन — 3:1-15
6. अंतिम अभिवादन — 3:16-18
1
नमस्कार व उपकारस्तुती
1 देव आमचा पिता व प्रभू येशू ख्रिस्त ह्यांच्या ठायी असलेल्या थेस्सलनीका शहरातील मंडळीला पौल, सिल्वान व तीमथ्य ह्यांच्याकडूनः 2 देवपिता व प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे तुम्हास कृपा व शांती असो.
3 बंधूनो, आम्ही सर्वदा तुम्हाविषयी देवाची उपकारस्तुती केली पाहिजे आणि हे योग्यच आहे कारण तुमचा विश्वास अतिशय वाढत आहे आणि तुम्हा सर्वांमधील प्रत्येकांची एकमेकांवरील प्रीती विपुल होत आहे; 4 ह्यावरून तुमच्या सर्व छळांत व तुम्ही जी सहनशीलता व जो विश्वास दाखविता त्याबद्दल देवाच्या मंडळ्यांतून आम्ही स्वतः तुमचा अभिमान बाळगतो. 5 ते देवाच्या योग्य न्यायाचे प्रमाण आहे; तो न्याय हा की, ज्यासाठी तुम्ही दुःख सोशीत आहात त्या देवाच्या राज्याला तुम्ही योग्य ठरले जावे. 6 तुम्हावर संकट आणणाऱ्या लोकांची संकटाने परतफेड करणे आणि संकट सोसणाऱ्या तुम्हास आम्हाबरोबर विश्रांती देणे, हे देवाच्या दृष्टीने न्याय्य आहे, 7 म्हणून प्रभू येशू प्रकट होण्याच्या समयी ते होईल; तो आपल्या सामर्थ्यवान देवदूतांसह स्वर्गातून अग्निज्वालेसहित प्रकट होईल. 8 तेव्हा जे देवाला ओळखत नाहीत व आपल्या प्रभू येशूची सुवार्ता मानीत नाहीत त्यांचा तो सूड उगवील. 9 तेव्हा त्यांना प्रभूच्या समोरून व त्याच्या सामर्थ्याच्या गौरवापासून दूर करण्यांत येऊन सर्वकाळचा नाश ही शिक्षा त्यांना मिळेल. 10 आपल्या पवित्रजनांच्या ठायी गौरव मिळावे म्हणून आणि त्यादिवशी पवित्रजनांच्या ठायी आश्चर्यपात्र व्हावे म्हणून तो येईल कारण आम्ही दिलेल्या साक्षीवर तुम्ही विश्वास ठेवला आहे. 11 याकरिता तर आम्ही तुम्हासाठी सर्वदा अशी प्रार्थना करतो की, आपल्या देवाने तुम्हास झालेल्या या पाचारणास योग्य असे मानावे आणि चांगुलपणाचा प्रत्येक मनोदय व विश्वासाचे कार्य सामर्थ्याने पूर्ण करावे; 12 ह्यासाठी की, आपला देव व प्रभू येशू ख्रिस्त ह्यांच्या कृपेने आपला प्रभू येशू ह्याच्या नावाला तुमच्या ठायी व तुम्हास त्याच्याठायी, गौरव मिळावे.