Joshua
यहोशवा
१
१ कनान देश जिंकणयाची पुर्वतयारी परमेश्वराचा सेवक मोशे हयाच्या मृत्यूनंतर मोशेचा परमेश्वराने सांगितले की, २ माझा सेवक मोशे मृत्यू पावला आहे, तर आता ऊठ व ह्यांना अर्थात् इस्ञाएल लोंकांसहित ही यार्देन ओलांडून जा. ३ मी मोशेला सांगितलें होते त्याप्रमाणे ज्या ठिकाणी तूमचे पाऊल पडेल तें तें ठिकाण मी तुम्हाला दिलें आहे. ४ रान व हा लबानोन ह्यांपासून महानद फरातपर्यतचा हित्ती ह्याचा सर्व देश व मावळतीकडे महासमूद्रापर्यतचा प्रदेश तुमचा होइल. ५ तुझ्या आयुष्यांत तुझ्यापुढे कोणाचाहि टिकाव लागणार नाहि, जसा मोशेबरोबर मी होतो तसाच तुझ्याबरोबरहि मी असेन. मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही. ६ खंबीर ही, हिंमत धर, कारण जो देश ह्या लोकांच्या पूर्वजांना देण्याची शपथ मी त्यांच्याजवळ वाहिली आहे तो तू ह्यांना वतन म्हणून मिळवून देशील. ७ माञ तू खंबीर हो व खूप हिंमत धर, आणि माझा सेवक मोशे ह्याने तुला दिलेलें नियमशास्ञ सगळें काळजीपूर्वक पाळ, ते सोडून उजवीडावीकडे वळूं नको, म्हणजे जाशील तिकडे तूं यशस्वी होशील. ८ नियमशास्ञाचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असूं दे, त्यांत जे काही लिहीलें आहे तें तूं काळजीपूर्वक पाळ आणि राञंदिवस त्याचें मनन कर, म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल व तुला यशःप्राप्ति घडेल. ९ मीं तुला आज्ञा केली आहे ना, खंबीर हो, हिंमत धर, घाबरू नको, कचरूं नको, कारण तूं जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तुझ्याबरोबर असेल. १० मग यहोशवानें लोकांच्या अमलदारांना अशी आज्ञा केली की, ११ छावणीतून फिरून लोकांना असा हूकूम द्या की, आपली भोजनसामग्री तयार करा. कारण तुमचा देव परमेश्वर जो देश तुम्हाला वतन करून देणार आहे त्याचा ताबा घेण्यासाठी तीन दिवसाच्या आत तुम्हांला ही यार्देन ओलांडायची आहे. १२ मग यहोशवानें रऊबेनी, गादी व मनश्शेचा अर्धा वंश ह्यांना म्हटलें, १३ परमेश्वराचा सेवक मोशे ह्याने तुम्हांला जी आज्ञा दिली होती तिचें स्मरण करा, तो तुम्हाला म्हणाला होता की, तुम्हांला स्वास्थ मिळावे म्हणून तुमचा देव परमेश्वर हा देश तुम्हाला देणार आहे. १४ ह्या यार्देनेच्या पूर्वेकडील जो देश मोशेनें तुम्हांला दिला आहे त्यांतच तुमच्या स्ञिया, मुलेंबाळे आणि गुरेंढेारें ह्यांनी राहावें, पण तुम्ही सर्व योध्दयांनी सशस्ञ होऊन आपल्या बांधवांपुढें नदीपलीकडे कूच करावें आणि त्यांना कुमक द्यावी. १५ परमेश्वर तुमच्याप्रमाणेंच तुमच्या बांधवांना स्वास्थ देईल आणि तुमचा देव परमेश्वर ह्यानें त्यांना दिलेल्या देशाचा तेहि ताबा घेतील, मग परमेश्वराचा सेवक मोशे ह्यानें यार्देनेच्या पूर्वेस, उगवतीकडे जो देश तुम्हाला दिला आहे त्या तुमच्या वतनांच्या देशांत परत येईन त्यांचा ताबा तुम्हीं घ्यावा. १६ तेव्हां त्यांनी यहोशवांला उत्तर दिलें, जें काही करण्याची तूं आम्हांला आज्ञा केली आहेस तें सर्व आम्ही करूं आणि तूं आम्हांला पाठवशील तिकडे आम्ही जाऊं. १७ जसें आम्ही सर्व बाबतींत मोशेचें ऐेकत होतों तसेंच आम्ही तुझेंहि ऐकू, माञ तुझा देव परमेश्वर मोशेबरोबर होता तसाच तुझ्याबरोबर असो. १८ तुझ्या आज्ञेविरूध्द बंड करणा-या व तुझी सर्व आज्ञावचनें न पाळणा-या प्रत्येकाला देहान्तशिक्षा द्यावी. तूं माञ खंबीर हो व हिमत धर.